साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान आक्षीला पाऊस entry घेतो. गेले कित्येक महिने सोसलेली काहिली संपते आणि पुढचे जवळपास 3 ते 4 महिने इथली माती, झाडं, आणि विहिरी पोटभरून आपली तहान भागवतात.
निसर्गात वेळोवेळी ऋतू बदलताना अनेक छोटे छोटे बदल घडत असतात. ह्याच बदलांमधला एक छोटासा बदल म्हणजे आमच्या वाडीत अचानक मोठ्या संख्येने येणारे Red cotton bugs म्हणजेच ‘तांबडे ढेकूण’. अचानक दारातल्या बकुळीच्या बुंध्यात असलेली हिरव्या अबोलीची झाडं लाल दिसायला लागतात ती त्यावर घर केलेल्या ह्या Red cotton bugs च्या टोळ्यांमुळे.
मग काय स्थानिक ‘उम्बील’ म्हणजेच ‘Fire ants’ ह्या पावसाळी मेजवानी पासून कशा दूर राहणार.

Please check my tiny film ‘Ants day out’ & hope you too will enjoy this feast.😋
राजेश जोशी, 2019.